














गावाची माहिती
परमोरी गावात जगदंबा माता मंदिर हे खूप जुन्या असून मूर्ती ही स्वयंभू असल्याने येथे नवरात्री काळात खूप गर्दी असते. गावात दररोज दर्शनासाठी खूप गर्दी असते चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी देवीची यात्रा भरते.
श्री पंकज पवार
ग्रामपंचायत अधिकारी
श्री जयराम दत्तात्रय दिघे
सरपंच
सौ कमल शिवाजी गांगोडे
उपसरपंच
गावात वर्षभर गणेशोत्सव, नवरात्र, होळी व इतर धार्मिक उत्सव उत्साहाने साजरे केले जातात. गावकरी एकत्र येऊन सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन यांचा आनंद घेतात. यामुळे सामाजिक एकोपा दृढ होतो.

ग्रामपंचायत दर महिन्याला ग्रामसभा घेते. गावातील विकासकामे, योजना, निधी याबाबत चर्चा करून ठराव मंजूर केले जातात. ग्रामस्थांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून पारदर्शक प्रशासन चालवले जाते.

गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव. शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य, कला, उद्योजकता, स्वच्छता, महिला सक्षमीकरण यामध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांना "सावित्रीची लेक" पुरस्कार प्रदान करण्यात आले.

शाळेत विज्ञान मेळावे, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व वाचन संस्कार उपक्रम होतात. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मार्गदर्शन वर्ग व स्पर्धा परीक्षा तयारी केली जाते.

स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिनानिमित्त,माजी सरपंच, सैनिक यांचा ग्राम गौरव सोहळा दिनांक 15 ऑगस्ट 2025.

कृषी विभागाच्या मदतीने शेतीविषयक मेळावे आयोजित केले जातात. नवीन पिक पद्धती, खत व्यवस्थापन, ठिबक सिंचन याबाबत माहिती दिली जाते. शेतकऱ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळते.

युवक मंडळामार्फत कबड्डी, खो-खो, क्रिकेट अशा क्रीडा स्पर्धा घेतल्या जातात. यातून तरुणांचा शारीरिक विकास आणि संघभावना वाढते. क्रीडेमुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण होते.

शैक्षणिक आणि आरोग्य जनजागृतीसाठी गावात विविध शिबिरे, कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन वारंवार केले जाते.

दारूबंदी, प्लास्टिकमुक्ती, जलसंधारण, महिला सुरक्षा यांसारख्या विषयांवर गावात मोर्चे, सभा व कार्यशाळा होतात. अशा कार्यक्रमातून सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण होते.

जल जीवन मिशन अंतर्गत बांधण्यात आलेली पाण्याची टाकी नुकतीच पूर्ण झाली असून, गावातील प्रत्येक घरापर्यंत नळजोडणीद्वारे पिण्याचे पाणी पोहोचवण्याचे स्वप्न आता साकार झाले आहे.

युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड या आघाडीच्या औद्योगिक कंपनीच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून एक पाणी शुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले

ग्रामस्थ मिळून शाळा, रस्त्याच्या कडेला व सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करतात. वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती केली जाते. पर्यावरण संतुलन राखण्यास या उपक्रमाचा मोठा हातभार लागतो.

स्थानिक प्रशासन गावातील रस्ता दुरुस्ती व डांबरीकरणाचे कामाच्या दर्जाबाबत नेहमीच सतर्क असून, विकासकामे वेळेत आणि गुणवत्तेने पूर्ण होण्यासाठी सातत्याने निरीक्षण केले जात आहे.
मा. श्री ओंकार पवार
मा. डॉ. श्री अर्जुन गुंडे
मा. श्रीमती प्रतिभा संगमनेरे
मा. डॉ. श्रीमती वर्षा फडोळ
श्री भास्कर सावळीराम रेगडे
श्री भरत शामराव वेंदे
श्रीम. संजीवनी चौधरी
ALL RIGHTS RESERVED
A.S.Computer Services, Kalwan
9850080709 / 9511231137
